DIWALI ANI AYURVEDA

diwali festival 2774745 1280

DIWALI ANI AYURVEDA

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

कार्तिकात हळूहळू हवेमध्ये कोरडेपणा वाढू लागतो .अश्विनाच्या सुरवातीला हैराण करणारा उन्हाचा कडाका थोडा कमी होऊन, सकाळी व रात्री हवेमध्ये गारवा यायला सुरुवात होते . दिवस लहान आणि रात्री मोठ्या ,असे एकूण सर्व वातावरण असते . कार्तिकाच्या सुरुवातीला येते दिवाळी सर्व सणांचा मुकुटमणी असणाऱ्या दिवाळीतील अनेक प्रथा परंपरांच्यामागेही , आयुर्वेदातील अनेक शास्त्रीय संकल्पना आहेत असे दिसते . दिवाळीची सुरुवात होते आश्विन कृष्ण द्वादशीला वसुवारसाने. या दिवशी वासरू असणाऱ्या गाईचे पूजन केले जाते .शरद ऋतूमध्ये पित्तदोषाचा प्रकोप होतो आणि वर्षा ऋतूमध्ये एकूणच भूूूक आणि पचनशक्‍ती मंदावलेली असते, या दोन्हींला पुन्हा मूळ पदावर आणण्यासाठी उपयुक्त असे दोन महत्त्वाचे पदार्थ म्हणजे देशी गायीचे दूध व साजूक तूप हे दोन्ही आपल्याला देणाऱ्या गाईची पूजा करून, दिवाळीच्या सणाला सुरुवात करणे ही अत्यंत संयुक्तिक गोष्ट नाही का ? घरात व दवाखान्यात सकाळ, संध्याकाळी देशी गाईच्या गोवऱ्या जाळून, धूपन केल्यास अनेक प्रकारच्या infections पासून सुरक्षित राहता येते ,असा अनेक वैद्यांचा अनुभव आहे.

साक्षात् लक्ष्मी असणाऱ्याा देशी गाईला आज आपण आपल्या जीवनातून हद्दपार केले आहे, आणि अलक्ष्मी, अनारोग्य ओढवून घेतले आहे. दिवाळीच्या निमित्ताने आपण ही चूक सुधारूया आणि देशी गाईच्या पुनरुज्जीवनासाठी, आपल्याला शक्य आहे ते सर्व अवश्य करूया ,म्हणजेच खर्‍या अर्थाने वसुवारस साजरा केला असे होईल. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी आयुर्वेदाची आद्यदैवता श्री धन्वंतरी यांचा जन्मदिवस . धनत्रयोदशीचा दिवस आयुष मंत्रालयाने घोषित केल्याप्रमाणे , राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून संपूर्ण भारतात उत्साहाने साजरा केला जातो . धनत्रयोदशीच्या दिवशी प्रसाद म्हणून धने आणि गूळ वाटले जातात . धणे हे पित्तशामक आहेत, भूक वाढवणारे आहेत आणि अश्विन महिन्यात कडक उन्हामुळे होणारे उष्णतेचे विकार ,लघवीच्या तक्रारी ,अंगात आतून जाणवणारा दाह या सर्वावर अतिशय उपयुक्त आहेत रात्री एक चमचा धने थोडेसे कुटून, एक कप पाण्यात भिजत घालून, झाकून ठेवावे व सकाळी गाळून हे पाणी प्यावे. याला आयुर्वेदामध्ये हिम असे म्हटले जाते.

शरीरातील उष्णतेचे विकार दूर होण्यासाठी हा धान्यक हिम अतिशय उपयुक्त ठरतो. याशिवाय रोजच्या जेवणात गरम मसाल्याच्या ऐवजी, धने-जिरे पावडर ,ताजी कोथिंबीर यांचा भरपूर वापर, या काळात करणे आवश्यक आहे. धनत्रयोदशीच्या प्रसादात धन्याच्या जोडीला आहे गूळ. आता हळूहळू हिवाळा सुरू होणार तेव्हा पौष्टिक , शक्तीवर्धक गूळ हा हवाच .त्याची आठवण करून देण्यासाठी धन्याच्या जोडीला गुळाची योजना केलेली आहे. पावसाळ्यानंतर गुळाचे उत्पादन करणारी गुऱ्हाळीही सुरू होतातचं . दिवाळीला सगळ्यात महत्त्वाचा सोपस्कार म्हणजे अभ्यंगस्नान नरकचतुर्दशीच्या दिवशी ही प्रथा पाळली जाते .

या सुमारास हवेमध्ये हळूहळू कोरडेपणा वाढत चाललेला असतो ,त्यामुळे त्वचा कोरडी होते . त्वचेची ही रुक्षता वेळीच आटोक्यात ठेवण्यासाठी, स्निग्ध गुणाचे तेल सर्व अंगाला जिरवणे म्हणजे अभ्यंग करणे. अभ्यंग करणे ही अतिशय उचित प्रथा आहे, अभ्यंगाविषयी मी माझ्या अनेक लेखातून ,बरेचदा सविस्तर लिहिलेले आहेचं. अभ्यंगस्नान फक्त दिवाळीच्या दिवशी करायचे नसून, त्यानंतर पूर्ण हेमंत आणि शिशिर ऋतू पर्यंत ,म्हणजे जवळजवळ होळीपर्यंत, रोज किंवा आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा करायचे आहे. त्यामुळे आपल्याला अनेक फायदे मिळतात . नित्य अभ्यंग केल्यामुळे तारुण्य टिकून राहते, त्वचा तजेलदार राहते, शरीर बांधेसूद राहते ,आयुष्य वाढते ,दृष्टी सुधारते आणि हो – मुख्य म्हणजे मन अतिशय प्रसन्न राहते अभ्यंग केल्यानंतर साबण न वापरता ,सुगंधी उटणे किंवा मसूर डाळीचे पीठ अंगाला चांगले चोळून लावावे, त्यालाच आयुर्वेदाच्या भाषेत उद्वर्तन असे म्हटले जाते, मगचं आंघोळ करायची आहे .

उद्वर्तनामुळे शरीराची रोमरंध्र स्वच्छ होऊन , रक्तप्रवाहण सुधारते,त्वचा नितळ होते ,अंगावरील फाजील चरबी कमी होते आणि अग्नि चांगलाच प्रज्वलित होतो . जे खाऊ ते पचते व अंगी लागते . कार्तिकातील वातावरणामुळे, तसेच अभ्यंग केल्याने ,भूक आणि पचनशक्ती मध्ये सुधारणा होते. त्यामुळेच दिवाळीचे चमचमीत, गोड पदार्थ पचवण्याची ताकद प्राप्त होते पण यासाठी अभ्यंगाला ,या काळात व्यायामाची  जोड देणे आवश्यक आहे . सूर्यनमस्कार, फिरणे ,धावणे, पोहणे, सायकल चालवणे, डोंगर चढणे  यापैकी जो व्यायाम शक्य आहे तो  हळूहळू सुरू करावा. अगदी काहीच जमलं नाही, तर सध्याच्या  काळात  घरातील केर-लादी वाकून साफ करणे हा  व्यायाम निश्चितच उपयोगी ठरेल .

ज्यांना वजन वाढवायचे आहे, ज्यांना आजारपणामुळे खूप अशक्तपणा आलेला आहे, अशा सर्वांसाठी अभ्यंग करणे हा उत्तम उपचार आहे. कार्तिक महिन्यातली आणखी एक प्रथा आहे, ती म्हणजे कार्तिकस्नान .आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा ,असे महिनाभर रोज पहाटे उठून स्नान करणे. रात्र मोठी असल्यामुळे झोप जास्त होते आणि पहाटे गारवा असल्यामुळे पांघरूणात गुरफटून झोपावेसे वाटते . पण उशीरापर्यंत झोपल्याने थंडी तर पळत नाहीच पण उलट आळसावलेपणाचं जास्त येतो , म्हणून पहाटे पहाटे स्नान केल्याने थंडी वाजण्याची  बंद होते, शरीर आणि मन प्रसन्न होऊन दिवसभराच्या कामाचा उत्साह वाढतो.पण यासाठी अभ्यंगाला ,या काळात व्यायामाची  जोड देणे आवश्यक आहे . सूर्यनमस्कार, फिरणे ,धावणे, पोहणे, सायकल चालवणे, डोंगर चढणे  यापैकी जो व्यायाम शक्य आहे तो  हळूहळू सुरू करावा. अगदी काहीच जमलं नाही, तर सध्याच्या  काळात  घरातील केर-लादी वाकून साफ करणे हा  व्यायाम निश्चितच उपयोगी ठरेल . ज्यांना वजन वाढवायचे आहे, ज्यांना आजारपणामुळे खूप अशक्तपणा आलेला आहे, अशा सर्वांसाठी अभ्यंग करणे हा उत्तम उपचार आहे. 

कार्तिक महिन्यातली आणखी एक प्रथा आहे, ती म्हणजे कार्तिकस्नान . आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा ,असे महिनाभर रोज पहाटे उठून स्नान करणे. रात्र मोठी असल्यामुळे झोप जास्त होते आणि पहाटे गारवा असल्यामुळे पांघरूणात गुरफटून झोपावेसे वाटते . पण उशीरापर्यंत झोपल्याने थंडी तर पळत नाहीच पण उलट आळसावलेपणाचं जास्त येतो , म्हणून पहाटे पहाटे स्नान केल्याने थंडी वाजण्याची  बंद होते, शरीर आणि मन प्रसन्न होऊन दिवसभराच्या कामाचा उत्साह वाढतो.पण यासाठी अभ्यंगाला ,या काळात व्यायामाची  जोड देणे आवश्यक आहे . सूर्यनमस्कार, फिरणे ,धावणे, पोहणे, सायकल चालवणे, डोंगर चढणे  यापैकी जो व्यायाम शक्य आहे तो  हळूहळू सुरू करावा. अगदी काहीच जमलं नाही, तर सध्याच्या  काळात  घरातील केर-लादी वाकून साफ करणे हा  व्यायाम निश्चितच उपयोगी ठरेल .

ज्यांना वजन वाढवायचे आहे, ज्यांना आजारपणामुळे खूप अशक्तपणा आलेला आहे, अशा सर्वांसाठी अभ्यंग करणे हा उत्तम उपचार आहे.  कार्तिक महिन्यातली आणखी एक प्रथा आहे, ती म्हणजे कार्तिकस्नान .आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा ,असे महिनाभर रोज पहाटे उठून स्नान करणे. रात्र मोठी असल्यामुळे झोप जास्त होते आणि पहाटे गारवा असल्यामुळे पांघरूणात गुरफटून झोपावेसे वाटते . पण उशीरापर्यंत झोपल्याने थंडी तर पळत नाहीच पण उलट आळसावलेपणाचं जास्त येतो , म्हणून पहाटे पहाटे स्नान केल्याने थंडी वाजण्याची  बंद होते, शरीर आणि मन प्रसन्न होऊन दिवसभराच्या कामाचा उत्साह वाढतो.

पण यासाठी अभ्यंगाला ,या काळात व्यायामाची  जोड देणे आवश्यक आहे . सूर्यनमस्कार, फिरणे ,धावणे, पोहणे, सायकल चालवणे, डोंगर चढणे  यापैकी जो व्यायाम शक्य आहे तो हळूहळू सुरू करावा. अगदी काहीच जमलं नाही, तर सध्याच्या  काळात  घरातील केर-लादी वाकून साफ करणे हा  व्यायाम निश्चितच उपयोगी ठरेल . ज्यांना वजन वाढवायचे आहे, ज्यांना आजारपणामुळे खूप अशक्तपणा आलेला आहे, अशा सर्वांसाठी अभ्यंग करणे हा उत्तम उपचार आहे. कार्तिक महिन्यातली आणखी एक प्रथा आहे, ती म्हणजे कार्तिकस्नान .

आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा ,असे महिनाभर रोज पहाटे उठून स्नान करणे. रात्र मोठी असल्यामुळे झोप जास्त होते आणि पहाटे गारवा असल्यामुळे पांघरूणात गुरफटून झोपावेसे वाटते . पण उशीरापर्यंत झोपल्याने थंडी तर पळत नाहीच पण उलट आळसावलेपणाचं जास्त येतो , म्हणून पहाटे पहाटे स्नान केल्याने थंडी वाजण्याची  बंद होते, शरीर आणि मन प्रसन्न होऊन दिवसभराच्या कामाचा उत्साह वाढतो.

Contact Information

+91 99870 77407
Shop No 11, JP Celeste Building, near JP North Garden City, Ghodbunder Village, Mira Road (E), Dist- Thane, 401107